Ticker

6/recent/ticker-posts

मालेगाव पोलीसांचे स्वातंत्र्य दिनी रक्तदान


मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

    जिल्ह्यात सर्वत्रच 79 व्या स्वातंत्र महोत्सवाचा जल्लोष साजरा केला जात असताना मालेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान केले.स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर वाशिम ब्लड बँक यांच्या साह्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान दान शिबिरात मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात वाशिम येथील ब्लड बँक द्वारा संबंधित पोलीस कर्मचारी होमगार्ड तथा सामाजिक कार्यकर्ते आधी जणांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

     रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याकारणानें तो अधिकार सर्वांनी बजावलाच पाहिजेत असे मत पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या वतीने करण्यात आले यावेळी रक्तदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे सहाय्यक पोलीस, निरीक्षक गायकवाड, पीएसआय दिलीप रहाटे,पोलीस अंमलदार सुनील पवार,शिवाजी काळे, किशोर चिंचोळकर, दिलीप, राठोड ,गणेश मेंटांगळे अमोल पवार मारुती गायकवाड, वानखेडे, उमेश बोराटे, विष्णू मुसळे,,जीतू पाटिल, गजानन शिंदे, केशव गोडघासे अनिल काळदाते,विजय मोरे ,राजू कालापाड,पांडुरंग उगले , होमगार्ड सैनिक महादेव मुठाळ, गणेश तागडे,राम ठाकरे यांनी रक्तदान करून कर्तव्या सोबत सामाजिक दायित्व पार पाडले.