Ticker

6/recent/ticker-posts

भौरद येथील आरोग्य वर्धीनी उपकेंद्राचे लोकार्पण



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

भोरद - मालेगाव तालुक्यातील मेडशी प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्रात अंतर्गत येणाऱ्या भौरद येथील आरोग्य वर्धीनी उपकेंद्राचे लोकार्पण पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने १५ ऑगस्ट रोजी पार पडले 

या प्रसंगी भौरद येथील आरोग्य वर्धीनी उपकेंद्रात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य प्रदिप तायडे यांची तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन शिंदे,मेडशी चे सरपंच शेख जमीर भाई, तालुका स्तरीय तंटामुक्त मुल्यमापन समीतीचे सदस्य यशवंत हिवराळे, सरपंच बेबी गाडे, पोलीस पाटील कैलास राव नप्ते,संजय भागवत डॉ शुभम सपकाळ, उपसरपंच दत्तराव नप्ते, ग्रामपंचायत सदस्य वसंत जटाळे,अंकोश जटाळे,सरीता जटाळे,सरस्वती झ्याटे,मनोहर झ्याटे, दगडाबाई खुळे, प्रिती जटाळे यांची उपस्थिती होती 

आदीवासी समाज बहुल लोकवस्ती असलेल्या दुर्गम भागातील भौरद येथील आरोग्य वर्धीनी उपकेंद्रा मुळे परिसरातील हजारो नागरिकाना वेळेत व योग्य आरोग्य सेवा मिळणारं आहे सोबतच आक्स्मीक सेवा सुध्दा मिळणार असल्याने जनतेची वेळ व आर्थिक बचत होणार आहे या सेवेचा नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन यशवंत हिवराळे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पि.एस.ठोंबरे तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी खासबागे यांच्या मार्गदर्शना खाली आरोग्य सहाय्यक गजानन शिंदे, आरोग्य सेवक संदीप नप्ते, आरोग्य सेवक सुनील तायडे, आरोग्य सेवक ज्ञानेश्वर नप्ते, आरोग्य सेवक प्रभाकर दुधाडकर, आरोग्य सेविका वंदना सांगळे आरोग्य सेविका रिता काकडे,वाहन चालक सहदेव तायडे,बादल हडाळे,दिपक नप्ते,शंकर गोंडाळकर, महादेव देवकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संदीप नप्ते यांनी तर आभार सुनील तायडे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला बहुसंख्य ग्रामस्थांची उपस्थिती होती