निळकंठ वसू, प्रतिनिधी
आलेवाडी : गावात गेल्या 40 वर्षांपासून चालत आलेली प्राचीन परंपरा यंदाही श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. विदर्भातील प्रसिद्ध रोडगे करून, फत्तेपूर महाराज बैल यांची देव म्हणून पूजा करण्यात आली. गावातील प्रत्येक गायवाड्यात पारंपरिक पद्धतीने नैवेद्य दाखवण्यात आला.
या कार्यक्रमासाठी गावकरी, पाहुणे, आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजा संपल्यानंतर एकत्र जेवणाचा कार्यक्रम झाला, ज्यामध्ये पारंपरिक खाद्यपदार्थांचा समावेश होता. ही परंपरा गावातील एकात्मता आणि धार्मिक श्रद्धेचे प्रतीक मानली जाते.
Social Plugin