बुध , दि. [प्रकाश राजेघाटगे ]
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सेवागिरी विद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या आवाहनानुसार विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच रियल डेअरी इंडस्ट्री लि., बारामतीचे सर्वेसर्वा मनोज तुपे यांनी ५१ हजार रुपये देऊन विद्यालयाला भरीव मदत केली.
यापुढेही विद्यालयाच्या सर्वांगीण विकासा साठी आम्ही खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन मनोज तुपे यांनी देत विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला मदत करावी असे आवाहन केले आहे.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. बी. सावंत म्हणाले, माजी विद्यार्थी मनोज तुपे यांचे दातृत्व म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही तर पुढील पिढीला घडविण्यासाठीची सामाजिक जबाबदारीची महत्त्वाची भूमिका आहे. ही परंपरा या वर्षी शाळा सुरू झाल्यापासूनच जून, जुलै व ऑगस्ट या प्रत्येक महिन्यात असे दातृत्व दाखविणारे अनेक विद्यार्थी करत आले असून ही गोष्ट निश्चितच प्रेरणादायी आणि आम्हा शिक्षकांसाठी पण अभिमानाची आहे.
आपल्या विद्यालयाचा नावलौकिक वाढविण्यासाठी येथे शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करत असलेल्या माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Social Plugin