Ticker

6/recent/ticker-posts

कर्तव्याची जाणीव आणि विद्यार्थांवर प्रेम म्हणून नाकारली सोयीची बदली



इसाक शेख :-नांदगाव 

    नांदगाव तालुक्यातील जवळकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक  उर्दू शाळेवर कार्यरत असणारे मुख्याध्यापक श्री शफिक जलील अहेमद हे गेल्या 8 वर्षा पासून   शिक्षणाचे धडे आपल्या विदर्थ्यांना देत आहे.ह्या काळात गुरु आणि शिस्य यांचा नातं इतका घट्ट झाला कि त्यांनी आपल्या सोयी नुसार झालेली बदली तेपण अगदी आपल्या घरापासून जवळ ती ही नाकारली या अगोदर बोलठाण शाळेवर 14 वर्ष त्यांनी आपली सेवा दिली. गेल्या 24 वर्षांपासून ते आपल्या परिवारापासून लांब राहून आपला कर्तव्य पुर्ण इमानदारीने पार पाडत आहे.

      जवळकी हे गाव घाट माथ्यावर तालुक्याच्या अगदी शेवट च्या टोकाला असून शहेरी भागातील शिक्षक येण्यास तयार होत नाही. ज्यावेळेस सर जवळकी येथे आले त्यावेळेस शाळेतील पटसंख्या अगदी कमी होती. त्यांनी घेतलेल्या मेहनतीने आज पट संख्या 50 च्यावर आहे.त्यांच्या कर्तव्यची दखल म्हणून जवळकी ग्रा. पं. च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. व श्री शफिक सर यांना येणाऱ्या काळात आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा म्हणून ग्रा. पं. जवळकी यांस कडून  माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांना पत्र व्यवहार करण्यात येईल असे आश्वासन सरपंच श्रीमती अलमीना शेख यांनी दिले.