अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी गावातील रस्त्यांची दुरवस्था ही आता एक नित्याचीच समस्या बनली आहे.गावातील मुख्य चौकापासून ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे.व गावापासून शाळेचे अंतर एक किलोमीटर पर्यंत आहे या रस्त्यावरून चालणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे आहे व धनगर पिंपरी या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र असून बाहेरील येणाऱ्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच याचा त्रास होत आहे.मागील महिन्यातच एका दुचाकीस्वाराचा अपघात या खड्ड्यांमुळे झाला होता.या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतरही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.ग्रामस्थ अनेक वर्षांपासून या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करत आहेत,पण त्यांची ही मागणी केवळ 'निवडणुकीपुरती'च मर्यादित राहिली आहे का ?'आम्ही कर भरतो,मग आम्हाला चांगले रस्ते का मिळत नाहीत ?'असा सवाल संतप्त धनगर पिंपरी ग्रामस्थ विचारत आहेत.याकडे प्रशासनाने व स्थानिक राजकारण्याने तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे..
Social Plugin