प्रतिनिधी:- ऊत्तम पाईकराव
हिमायतनगर शहर येथे रेल्वे स्थानकावर दिनांक ६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून 15 मिनिटांनी एक खळबळ जनक घटना उघडीस आली .आदीलाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेसच्या इंजिन समोर एका अंदाजे 20 वर्षे तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेने स्थानकात काही काळ प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. नेहमीप्रमाणे नंदिग्राम एक्सप्रेस स्थानकात थांबवली.
जेव्हा उपस्थित प्रवासाच्या ही धक्कादायक बाब लक्षात आली. मृतदेह इंजिनच्या समोरच लटकलेला दिसत होता. त्यामुळे यात्रेकरू ,स्थानिक नागरिक रेल्वे कर्मचारी यांनी तत्काळ गर्दी केली. काही वेळासाठी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती .
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाच्या वतीने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह खाली उतरून तपास करायला सुरुवात करण्यात आली आहे . प्राथमिक स्वरूपात मयताची ओळख पटली असून सदरील मृतांचे नाव गणेश पांडुरंग लोलेपवाड वय 20 वर्षे राहणार भिशी येथील रहिवासी असल्याचे समजले आहे . हा प्रकार घातपात आहे की अपघात आहे याची चौकशी सुरू आहे .बातमी लिहिल्या पर्यंत ग्रामीण रुग्णालयात मताची शिवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती. स्थानिक तसेच रेल्वे पोलिसाकडून मृत तरुणाच मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू केला असून रेल्वे कर्मचारी व प्रवासाची यांची चौकशी केली जात आहे.
Social Plugin