किनवट प्रतिनिधी शेख अमिरपाशा
मातोश्री जनकल्याण प्रतिष्ठान व महिला बचत गटाच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी सात वाजता लक्ष्मी नगर सूतगिरणी परिसर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी मानव उत्कर्ष महिला बचत गटाच्या सचिव व महिला मोटार मेकानिक त्रिवेणी कांबळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला याप्रसंगी जी एस पाटील व मातोश्री जनकल्याण प्रतिष्ठान च्या अध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या हस्ते शासकीय कर्तव्याबरोबर धम्म कार्यात सदैव अग्रेसर असणारे कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग छत्रपती संभाजी नगर येथून नुकतेच सेवानिवृत्त झालेले अशोक येरेकर व त्यांच्या सहचारीणी अशा येरेकर यांचा पुष्पहार,शाल व भारतीय संविधानाची उद्देशिका देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी आपल्या मनोगत मध्ये प्रथम मातोश्री जनकल्याण प्रतिष्ठान व महिला बचत गटाच्या कार्याचे कौतुक केले.
याप्रसंगी ज्येष्ठ उपासक जीएस पाटील, अशोक कांबळे यांनी भाषण केले याप्रसंगी महेंद्र पोपलवार यांनी आभार मानले रेखा कांबळे संकल्प महिला बचत गटाचे अध्यक्ष सुशीला पोपलवार, स्वावलंबी महिला बचत गटाच्या अध्यक्ष राजश्री सरपे, करुणाबाई भवरे, सुनिता भवरे, जिव्हाळा महिला बचत गटाचे अध्यक्ष सुलोचना भगत अशोक मुनेश्वर प्रभाकर भगत राजू सरपे बापूराव कांबळे तसेच मातोश्री जनकल्याण प्रतिष्ठानचे व महिला बचत गटाचे पदाधिकारी .सदस्य महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin