Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस अधीक्षक, तुषार दोशी यांनी केली कारागृहातील गणेशाची आरती



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

सध्या सुरू असलेल्या श्रीगणेशाचा सगळीकडे उत्सव चालू आहे. त्याचप्रमाणे कारागृह प्रशासन देखील सणांचे आयोजन व नियोजन करीत असते. कारागृहातील बंदयांनाही  समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कारागृह विभागाचे "सुधारणा पुनर्वसन" या ब्रीदवाक्यनुसार नेहमीच काम करत असते. त्याचाच एक भाग म्हणून कारागृहामधील बंदयांच्या मनातील वाईट विचार, भावना नष्ट व्हावी या हेतूने श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली.पोलीस अधीक्षक, श्री तुषार दोशी यांनी  सातारा कारागृहास भेट देऊन कारागृहामध्ये कारागृहातील बंदयांसाठी  बसविण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती केली. तसेच पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी बंदयांना मार्गदर्शन करताना म्हणाले, "श्रीगणेश ही बुद्धीची देवता आहे. तुम्हा सगळ्यांना सद्बुद्धी देवो आणि सर्वजण गुन्हापासून परावृत्त होवो, अशी शुभेच्छा देतो."

सदर कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी सतीश कदम, सुभेदार मानसिंग बागल व इतर अधिकारी,  कर्मचारी, बंदी हजर होते.