गणेश गावडे- पाटस प्रतिनिधी
बातमी- दौंड तालुक्यातील बिरोबावाडी व पाटस परिसरात मोठ्या प्रमाणात डाळिंब शेती केली जाते. तरी परिसरातील होणाऱ्या सततच्या पावसामुळे डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक डाळिंब शेतामध्ये पाणी साठुन राहिल्याने मोठे नुकसान झाले असून येथील स्थानिक शेतकरी हताश झाला आहे. यामुळे डाळिंब फळावर डांबऱ्या ,कुजवा, तेल्या अशा अनेक प्रकारच्या रोगांचा प्रभाव वाढल्याने दरवर्षीप्रमाणे बाजार भाव मिळेल का नाही. या विचाराने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. असे येथील शेतकरी प्रमोद गावडे, जयदीप गावडे, राहुल खारतुडे ,योगेश खारतुडे व कृषी सेवा केंद्र चालक तेजस येडे यांनी ग्रामीण महाराष्ट्र न्युजशी बोलताना सांगितले.





Social Plugin