Ticker

6/recent/ticker-posts

सहकार विद्या मंदिर मध्ये रक्षाबंधन साजरा



प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणीगवळी

  डोणगाव/ येथील बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी बुलढाणा द्वारा संचालित सहकार विद्या मंदिर शाळेत, विश्वास आणि संरक्षणाचे प्रतिक मानले जाणारा सण रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती आणि परंपरा जपणार्‍या या कार्यक्रमात शाळेतील नर्सरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

     संगीतमय वातावरणात कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यार्थीनींनी आपल्या विद्यार्थी भावंडांचे औक्षण करुन भाऊ बहिणींच्या पवित्र नात्यातील वीण घट्ट करणारा राखीरूपी धागा त्यांच्या मनगटावर बांधला. या सणाचे औचित्य साधून शाळेतील स्काऊट विद्यार्थ्यांनींनी डोणगाव पोलिस ठाण्यात जाऊन संरक्षणाचे व्रत घेतलेल्या पोलिस बांधवांना राख्या बांधल्या. शाळेचे मुख्याध्यापक सुनिल गाढे सर यांनी विद्यार्थ्यांना राखी पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या.

     विद्यार्थ्यांसाठी राखी बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी तयार करून आणलेल्या राख्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यासाठी परीक्षक म्हणून लाभलेले शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी घुगे सर व गोरे सर यांनी राख्यांचे अवलोकन करून उत्कृष्ट राख्यांची निवड केली. कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख चंद्रकांत नरवाडे सर व संदीप पंडीतकर सर, स्काऊटर निलेश राठोड सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.