Ticker

6/recent/ticker-posts

पांगरखेडच्या शिरपेच्यात मानाचा तुरा'



शिक्षक साहेबराव अंभोरे यांना ' आदर्श समाजसेवक' साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार 2025 जाहीर

साहेबराव अंभोरे @ ग्रामिण प्रतिनिधी 

मेहकर तालुक्यातील जि.प.पांगरखेड शाळेत पदविधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले साहेबराव दौलतराव अंभोरे यांना यावर्षीचा ' आदर्श समाज सेवक ' साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे.

     आंध्रुड येथील रहिवासी असलेले शिक्षक, गायक, सूत्रसंचालक , पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते तथा समाजसेवेसाठी रात्रंदिवस झटणारे,अनेकांच्या मदतीला धावणारे असे आंध्रुडचे सुपुत्र साहेबराव अंभोरे यांना आपल्या शिक्षण क्षेत्र तथा गायन, कलापथक, पथनाट्य या कलेद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केलेल्या समाज प्रबोधनाच्या कार्यासाठी ए.डी.फाउंडेशन,सांगली महाराष्ट्र राज्य द्वारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ' आदर्श समाजसेवक' साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार 25 जाहीर झाला आहे.

      ए.डी.फाउंडेशन,सांगली,महाराष्ट्र राज्य रजिस्टर नंबर 116/2024 यांच्यामार्फत संस्थेचे अध्यक्ष मा.अशोक श्रीपती गोरड,सांगली यांच्या निवड समितीने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे. साहेबराव अंभोरे यांनी ग्रामीण भागामध्ये एका गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतला असला तरी परिस्थितीवर मात करत त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले. जसे की, शिक्षण, गायन, समाजसेवा, पत्रकार, कोरोना योद्धा, यांच्या माध्यमातून त्यांनी आपली महाराष्ट्र मध्ये ओळख निर्माण केली.या सर्व केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. जसा पाऊस पडतो तसा त्यांच्यावर अभिनंदननाचा वर्षाव सुरू झाला आहे.

     सांगली येथे याच महिन्यात 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या एका भव्य पुरस्कार सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


 सामाजिक प्रबोधन आणि शोषितांच्या जगण्यातील व्यथा आपल्या पहाडी आवाजातून मांडणारे शाहिरीचा बुलंद आवाज म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेले साहेबराव अंभोरे यांना 'आदर्श समाजसेवक', ' साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार ' जाहीर करण्यात आला आहे.