Ticker

6/recent/ticker-posts

सावली शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने रक्षाबंधन उत्सव साजरा



सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

  रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण आहे, हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केल्या जातो. सावली शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  सावली नगरपंचायत च्या सर्व कर्मचाऱ्यांना तसेच पोलिस स्टेशन सावली सर्व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला, यावेळी साधना ताई वाढई अध्यक्ष नगरपंचायत सावली, माजी नगराध्यक्षा लता ताई लाकडे, सावली शहर महिला काँग्रेस अध्यक्ष भारती ताई चौधरी, नगरसेविका राधा ताई ताटकोंडावार, सावली शहर महिला काँग्रेस उपाध्यक्षा कविता ताई मुत्यालवार, जिल्हा काँग्रेस कमिटी महिला कार्यकारिणी सदस्या शिलाताई गुरणुले, सावली शहर महिला काँग्रेस कमिटी सदस्या प्रीती ताई संगिडवार उपस्थित होते.