राजुर घाट परिसरात खडकी फाट्याजवळ एस.टी. महामंडळाची भरधाव बस धडकून १३ मेंढ्यांचा जागीच मृत्यू तर ५ मेंढ्या गंभीर जखमी.
मन्सूर शहा प्रतिनिधी :---प्राप्त माहितीनुसार मोताळा तालुक्यातील भीषण घटना ! राजुर घाट परिसरात खडकी फाट्याजवळ एस.टी. महामंडळाची भरधाव बस. क्रमांक MH-20-BL-4036बसला धडकून १३ मेंढ्यांचा जागीच मृत्यू तर ५ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
या अपघातात वारुळी (ता. मोताळा) येथील मेंढपाळ संजयभाऊ दगडू बिचकुले यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऊन, पाऊस, वारा सहन करत स्थलांतरित जीवन जगणाऱ्या या कुटुंबाचे वर्षानुवर्षे जपलेले धन काही क्षणात नष्ट झाले.
ही केवळ जनावरांची हानी नाही, तर एका कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर कोसळलेले संकट आहे. एस.टी. प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करून संजयभाऊंना न्याय द्यावा, ही ठाम मागणी. होत असून. बस ड्रायव्हर ने थोडी सावधगिरी बाळगावी अशी जनतेतून अपेक्षा होत आहे. !





Social Plugin