मोख क्र.२ शेतशिवारातील घटना
राजपाल बनसोड
प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : तालुक्यातील मोख क्र.२ शेतशिवारातील नाल्यात एका ३० वर्षीय युवकाचा मृतदेह नाल्यात असल्याची परिसरात दुर्गंधी पसल्याने माहिती पडल्याची घटना आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
हिम्मत छगन राठोड (वय -३०) वर्ष रा. मोख क्र.२ असे मृतकाचे नाव आहे. सदर मृतक हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता नातेवाईकांनी त्याची शोधाशोध केली परंतु तो आढळून आला नाही. आज दि.२६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मोख क्र.२ शेतशिवारातील नाल्यात मृतदेह आढळला. दुर्गंधीवरून मृतदेह दोन दिवसांपासून असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतकाच्या पश्चात आई, वडील, चार बहीण असा परिवार आहे.
या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनात रामराव मूजमुले, रवी मोरलेवार, सुधा खडतकर, मिथुन जाधव करीत आहेत.





Social Plugin