विधानसभेत 105 आमदारांचा ठराव असताना सरकार उदासीन [प्रकाश राजेघाटगे ] राज्यात प्लास्टीक पुलामुळे शेतकरी उध्वस्त झाला असून विधानसभेत १०५ ठराव असतानाही सरकार उदासीन आहे . याबाबत शासनाने त्वरित प्लास्टीक फुलाबाबत निर्णय घ्यावा , अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी दिला आहे . आमदारांचा महाराष्ट्रात प्लास्टीक फुलाचा वर्षाव ... अतिवृष्टी महापूर पावसाचे थैमान, या सर्व कारणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी उध्वस्त झाला असून शेतीमालाला नसलेला हमीभाव, न झालेली कर्जमाफी या सर्व कारणाने शेतकरी पूर्ण अडचणीत असून या सरकारला शेतकऱ्याचे कोणतेही देणे घेणे नाही . कालच एका शेतकरी नेत्याने शेतकऱ्याचे होणारे नुकसान यावर शेतकऱ्यांनी नुकसानाची सवय लावून घ्यावी, अशी वक्तव्य केलेले आहे .नकली फुलाने महाराष्ट्रातील बाजारपेठ भरले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सरकारला दिसत नाहीत का ?निषेधार्थ आहे . या वक्तव्याचे निषेधार्थ सातारा जिल्हा शिवसेना याचा तीव्र निषेध करत आहे त्याचबरोबर सनासूदीचे अवचित साधून शेतकरी मायबाप आपल्या शेतात विविध फुलाची लागण करतात . परंतु या सर्व फुलावर प्लास्टीक फुलाचे अतिक्रमण झाले असून शेतकऱ्यांची फुल कवडीमोल दारात विकावी लागत आहेत . त्याला दरही राहिलेला नाही .या विषयावर शिवसेना आक्रमक असून येणाऱ्या काळात पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ,आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शेतकरी सेना तीव्र आंदोलन करणार असल्याचे प्रताप जाधव यांनी सांगितले .





Social Plugin