Ticker

6/recent/ticker-posts

सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा



सावली तालुका अध्यक्ष नितीन गोहने यांच्या हस्ते ध्वजारोहन

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

     भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला, हा दिवस संपूर्ण भारतात 'स्वतंत्र दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारताला ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वतंत्र मिळाले हा दिवस भारतासाठी खुप महत्वाचा आहे.  स्वातंत्र्यदिन आपल्याला आपल्या देशाच्या इतिहासाची आठवण करून देतो. ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले त्या वीरांना आपण आदराने स्मरण करतो. या दिनाचे औचित्य साधून विधिमंडळ गटनेते, लोकलेखा समिती अध्यक्ष तथा आमदार मा. श्री. विजय भाऊ वडेट्टीवार यांचे जनसंपर्क व तालुका काँग्रेस पक्ष कार्यालयात नितीन गोहने तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते व सावली शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार यांच्या मुख्य उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

     याप्रसंगी नगराध्यक्षा साधना ताई वाढई, माजी नगराध्यक्षा लता ताई लाकडे, उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार, नगरसेवक प्रीतम गेडाम, सचिन संगिडवार, नितेश रस्से, जेष्ठ नेते मोहन गाडेवार, नगरसेविका ज्योती गेडाम, ज्योती शिंदे, प्रियांका रामटेके, सीमा संतोषवार, अंजली देवगडे, पल्लवी ताटकोंडावार, माजी नगरसेवक छत्रपती गेडाम, माजी ग्रामपंचायत सदस्य कविता मुत्यालवार, माजी नगरसेविका संगीता गेडाम, युवा नेते रोशन बोरकर, नितीन दुधे, सुनील ढोले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन गोहने तर सूत्र संचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम यांनी मानले.