तानाजी कुरुंद मुंगशी ग्रामीण प्रतिनिधी
आज 15 ऑगस्ट 2025 रोजी ॲड. दिलीपरावजी सोपल माध्यमिक विद्यालय हळदुगे येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री सुखदेव जगताप (मेजर नाना) अध्यक्ष होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन जगताप हे होते, यावेळी हळदुगे गावच्या सरपंच सौ अनिता मोहिते, अंजली जगताप,भाग्यश्री जगदाळे, राजाभाऊ बूबासाहेब जगताप, कांतीलाल जगताप, विनायक कुरुंद, सुनील यादव, अमोल एखंडे, सुरेश यादव, मुबारक शेख, अमोल मोरे, दयानंद गुंड, चंद्रकांत जाधव, हनुमंत जाधव, रशीद शेख, दीपक जगताप, शिंदे सर, कसबे बप्पा, हनुमंत जगताप, रामचंद्र लंगोटे, शिवकुमार देवकते, राजकुमार जगताप,
सर्व स्टाफ,यांच्यासह माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते, यावेळी प्रत्येक वर्गाचे एक देशभक्तीपर गीत सादर झाले, तसेच 21 विद्यार्थ्यांची भाषणे सादर झाली.मार्च 2025 मध्ये एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यास गं.भा. पुष्पावती विनायक जगताप यांचे स्मरणार्थ श्री सुभाष विनायक जगताप यांचे तर्फे प्रथम क्रमांक आलेली विद्यार्थिनी, कुमारी दिव्या दीपक जगताप हिला पाच हजार एक रुपयाचे बक्षीस व ट्रॉफी देण्यात आली. द्वितीय क्रमांक प्रसाद भिसे तृतीय क्रमांक भारतीय कांबळे व रणजीत करपे यांचा सत्कार करण्यात याच विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.आठवी एन एम एम एस मधील व पाचवी स्कॉलरशिप मधील तसेच सहावी एटीएस व सातवी एटीएस मधील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला बार्शीतालुका विज्ञान अध्यापक मंडळ व सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ तर्फे विज्ञान मध्ये प्रथम क्रमांक आलेली भारती राजेंद्र कांबळे हिला ट्रॉफी व प्रशस्तिपत्र देण्यात आले.यावेळी श्री प्रभाकर अवताडे साहेब यांचे तर्फे कैलासवासी सौ मंगल अवताडे यांच्या स्मरणार्थ मार्च 2026 मध्ये SSC परीक्षेत 90+ गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना 5001 रुपये बक्षीस जाहीर केले तसेच 5 वी ते 9 वी पर्यंत chya प्रत्येक वर्गातील मुलींना प्रत्येकी 1001 रूपये बक्षीस जाहीर केले , . गं भा. पुष्पावती विनायक जगताप यांचे स्मरणार्थ श्री सुभाष विनायक जगताप यांची तर्फे दहावी मधील प्रथम क्रमांक 2501रुपये . द्वितीय क्रमांक 1501रुपये व तृतीय क्रमांक 1001 रुपये व तिघांनाही ट्रॉफी देणार असल्याचे जाहीर केले.श्री विनायक देवकते यांनी भाषण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कंपास पेटी बक्षीस दिली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोल देशमुख सर व मनोज नागटिळक सर यांनी केले . प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रताप नागटिळक सर यांनी मनोगत व आभार प्रदर्शन व्यक्त केले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सर्वांचे हार्दिक आभार





Social Plugin