Ticker

6/recent/ticker-posts

जय पराजयापेक्षा स्पर्धेत सहभाग महत्त्वाचा - मोहनराव गुरव



 बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

मोबाईलच्या वेडामुळे तरुण पिढी मैदानी व साहसी खेळाकडे दुर्लक्ष करत आहे. आजच्या काळात मैदानी खेळ तसेच देशी खेळाकडे लक्ष द्यायला हवे. थांग- ता सारख्या साहसी खेळांमुळे मुलांच्यात स्वरक्षणाचे तसेच समाज रक्षणाचे योग्य धडे व शिक्षण मिळत आहे. स्पर्धेत विजय पराजयापेक्षा सहभाग सुद्धा फार महत्त्वाचा असतो.असे विचार प्रसिद्ध निवेदक व गीतकार श्री मोहनराव गुरव यांनी यांनी व्यक्त केले . ते सातारा जिल्हा थांग-ता चॅम्पियनशिप स्पर्धा उद्घाटन प्रसंगी पुसेगाव येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष श्री जयवंत गोडसे यांनी उपस्थिताचे स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष धनंजय निकम, खजिनदार अजित घाटगे, कोच अनिकेत गोडसे, कोच,मंथन पवार निवृत्त पोलीस अधिकारी श्री पोपटराव जगताप, खेळाडू,कोच,पालक स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अजित घाटगे यांनी आभार मानले.