बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून ९ऑगस्ट १९४२ या दिवशी महात्मा गांधींनी "भारत छोडो "आंदोलनाची सुरुवात केली होती. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.विजयराव नलवडे यांनी केले. पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी प्राचार्य डॉ. नलवडे बोलत होते.
व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. पी .भोसले, प्रा.डॉ.अनिल जगताप, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद,प्रा.डाॅ.संजय क्षीरसागर, इत्यादी उपस्थित होते.पुढे आपल्या भाषणात प्राचार्य डॉ. नलवडे म्हणाले, भारत छोडो या आंदोलनामुळे भारतीयांच्यामना मध्ये स्वातंत्र्याची जाणीव जागृत केली. आणि ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढण्यासाठी एकजूट होण्यास प्रवृत्त केले.तसेच क्रांतिकारकांनी ज्या निस्वार्थी देशभक्तीने आपले प्राण अर्पण केले ती प्रेरणा आजच्या तरुणांनी घेतली पाहिजे. कारण १९४३ ते १९४६ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांच्या विरुद्ध पत्री सरकार स्थापन करण्यात आले.अनेक गावात कायदा व्यवस्था,न्यायाची देखील जबाबदारी घेतली होती. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले म्हणाले, अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. याविषयी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना देश सेवा करण्याविषयीचेआवाहन केले. कार्यक्रम प्रसंगी अनपटवाडी येथील विनोद अंगद भोसले या शहीद जवानाला आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ.अनिल जगताप यांनी केले .सूत्रसंचालन प्रा.एम. एन.आवळे यांनी केले.तर आभार प्रा.डॉ. किरण कुंभार यांनी मानले .कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin