Ticker

6/recent/ticker-posts

सरांडी/बु. येथील आयोजित शिबीरातुन जिल्हात विक्रमी रक्तदान



महीलांही सरसावल्या रक्तदानासाठी ; १३० रक्तदात्यांनी केले रक्तदानआयोजकांचे सर्वञ कौतुक व रक्तदात्याचे आभार

   लाखांदुर प्रतिनिधी मच्छिंद्र मावळे 

तालुक्यातील जयदुर्गा क्रिडा मंडळ सरांडी /बु. तथा समस्त ग्रामवासीयांचे सहकार्यातुन दि. १५ आॅगस्ट स्वातंञ्यदिनी शासकिय रक्तपेटी भंडारा यांना पाचारण करुन प्रा.आ.केंद्र सरांडी/बु येथे सकाळी १.०० ते ३.०० वाजे दरम्यान भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीराचे विधीवत व स्फीत कापुन उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी पं.स. सदस्य  सौ. अमृता ठाकरे , माजी उपसरपंच विलास तिघरे, रविभाऊ शहारे, नितीन ढोरे, मच्छिंद्र मावळे,डाॅ. व्ही डब्लु बन्सोड, डाॅ. शुभचंद्र नखाते, डाॅ. खुशाल भोयर, आ.स.अजय गजभिये, आ.से.विद्या भारती यांचे मंडळ सदस्य,रक्तदानास आलेले शेकडोसे संख्येने रक्तदाते व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर रक्तदानाला सुरुवात झाली असुन १७५ चे वर रक्तदानासाठी रक्तदात्यांनी अर्ज केले असता त्यात महीलाही रक्तदानाकरीता आलेल्या होत्या. माञ सदर अर्जानुसार आरोग्य तपासणी अंती योग्य १३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. हा शासकीय रक्तपेटी भंडारा यांना या आयोजित शिबीरातीन प्राप्त १३० रक्तदात्यांनी केलेले रक्तदान हे जिल्हात आजपर्यत घेण्यात आलेल्या शिबीरांचा विक्रम मोडीत सर्वात मोठ्या संख्येने केलेले रक्तदान शिबिर ठरले.                              रक्तदात्यांना प्रोत्साहन मिळावे व एक समाजसेवी , देशसेवी सदर रक्तदान शिबीराला जि.प.सदस्या लता नरुले,शिवसेना (सिंदेगट)प्रमुख विनोद ढोरे, सामाजिक कार्यकर्ते विलास नरुले,जोसेफ वाढई, सरपंच अरविद ठाकरे यांनी भेट दिली असुन या शिबीरामध्ये पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व परीसरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी रक्तदान केले. सदर रक्तदानाचे यशस्वीतेकरीता  सहकार्य करणार्‍या रक्तदात्यांचे , सहकारी यांचे आभार जयदुर्गा मंडळ सरांडी /बु तथा ग्रामस्थांकडुन आभार व्यक्त करण्यात आले.