मेडशी: वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊस चालू असून मालेगाव तालुक्यातील मेडशी गाव व त्याच्या आजूबाजू असलेल्या आठ ते दहा गावाखेड्यात पावसाने नदी नाले एक झाले. परिणामी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी मेडशी येथील नितीन त्र्यंबक तायडे यांनी केली आहे.
जिल्ह्यात ढगफुटी सदृश संततधार पावसाने थैमान घातल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच मालेगाव तालुक्यातील मेडशी परिसरातील गरीब शेतकरी वर्गाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा बिकट परिस्थितीत प्रशासनाकडून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्या, नितीन त्र्यंबक तायडे यांनी केली आहे. सततधार पावसामुळे लहान, मोठ्या नदीनाल्यांना पूर येते आहे. तालुक्यातील ही सलग दुसरी व तिसरी नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी उभ्या पिकांसह खरडून गेल्या आहेत. तर, इतर शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचे तळे साचल्याने पिकांची नासाडी झाली आहे. परिणामी, पहिलेच कर्जाच्या बोझात असलेल्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने कंबरडे मोडले आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकाऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.





Social Plugin