Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार दिव्यांग संघटना तुमसर तर्फे ७/१२ कोरा-कोरा चा नारा देवुन खापा गावात पोळयाचा सण साजरा



खापा (तुमसर) ग्रामीण प्रतिमा: यादवराव बुराडे

बैल पोळा हा शेतकऱ्यांचा सण आहे, जो श्रावण अमावस्येला साजरा केला जातो. हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जात असून त्यामागील हेतू म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. शेतीच्या कामात मदत करणाऱ्या बैलांना या दिवशी सजवले जाते, त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना विश्रांती दिली जाते. बैल पोळा हा कर्म, श्रद्धा आणि पशुप्रेम यांचा संगम आहे. या दिवशी बैलांची शोभायात्रा निघते आणि संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण असते. हा सण शेतकऱ्यांचे बैलावरील प्रेम आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे..  आज खापा गावात बैल पोळ्याच्या सणाचे अवचीत्य साधुन गावात एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे पोळ्यामंध्ये आलेल्या सर्व शेतकरी बांधव व लाडक्या बहिणीच्या हातात  ७/१२ कोरा-कोरा, शेतकऱ्यांची कर्ज माफी व्हावी असे फलक घेऊन शेतकऱ्यांची कर्ज माफी झालीच पाहिजे असा मोलाचा संदेश दिला यामंध्ये सर्व शेतकरी बांधवांनी सक्रीय सहभाग दिला.पोळा हा सण शेतकरी बांधवांकरीता एक महत्वाचा सण आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवुन शेतकरी बांधव पोळा सण साजरा करीत असतात. शेतकऱ्यांची कर्ज माफी व्हावी या करीता मा. बच्चुभाऊ कडू नेहमी प्रयत्नशील असतात.

      बच्चु  भाऊंनी दिलेल्या आदेशानुसार संपुर्ण राज्यात पोळ्याच्या दिवशी शासना पर्यंत एक संदेश पोहचावा म्हणुन प्रहार संघटने तर्फे सात बारा कोरा करा, शेतकऱ्यांची कर्ज माफी करा असा संदेश प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष शेषराव गणविर व त्यांच्या प्रतिनिधींनी पोळ्यात आलेल्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी दिला. आणि एक आगळा-वेगळा पोळ्याचा सण साजरा केला. 

       याप्रसंगी उपस्थित येथील सर्व पदाधिकारी, जेष्ठ नागरीक, दिव्यांग बांधव, कामगार बांधव,निराधार बांधव, तसेच संपुर्ण शेतकरी-शेतमजुर बांधव व ग्रामवाशी उपस्थित होते.