गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
गट ग्रामपंचायत रामनगर येथे दि.२५.०८.२०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी श्री.संजय भाऊ किसनदास चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी चा ठराव मांडला आला.या सभेत या विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चे दरम्यान अध्यक्ष पद करिता श्री.संजय चव्हाण यांच्या नावाला समर्थन मिळाल्याने श्री.संजय भाऊ चव्हाण यांची अविरोध तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.या समिती मध्ये एकूण २२ सदस्य आहे.सतत चौथ्यांदा अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे गावांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झाले आहे.या निवडीचे श्रेय त्यांनी गावाचे पोलीस पाटील श्री.सुर्यकांन्त जाधव,सरपंच श्री.भिमराव चव्हाण श्री.साहेबराव चौधरी,उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य तसेच गावातील जेष्ठ नागरिक व युवा कार्यकर्ता यांना दिला आहे.





Social Plugin