देगलूर प्रतिनिधी - जावेद अहेमद
आज दिनांक 05/08/2025 रोजी रिझर्व बँकेच्या आर्थिक समावेशन उपक्रम क्रिसिल फाउंडेशनच्या माध्यमातून नांदेड जिल्हा तालुका देगलूर तडखेल या गावी आर्थिक साक्षरता मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया चे ब्रांच मॅनेजर सतीश बनसोडे सर,कपिल व्ही . एम ,तसेच बीसी शेख मोईन शेख मुजीब ,विलास पाटील गंगाधर पुयालवाड हे उपस्थित होते तसेच गावातील सरपंच प्रतिष्ठित नागरिक व पोलीस पाटील हे देखील उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वित्तीय साक्षरता केंद्राच्या देगलूर FC संगीता वाघमारे यांनी केले या मेळाव्यात उपस्थित सर्व नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा जनधन खाते सुकन्या समृद्धी योजना डिजिटल व्यवहार आर डी एफ डी सुकन्या समृद्धी योजना अटल पेन्शन योजना ह्या सर्व विविध बँकिंग क्षेत्रातील योजना गावातील उपस्थितांना समजावून सांगितले व तसेच ग्रामस्थांना बँक आपल्या दारी या माध्यमातून लोकांना सेवा दिल्या यासाठी गावातील सरपंच प्रतिनिधी राजू गंगाधर कटारे यांनी व पोलीस पाटील यांनी प्रयत्न करून या कार्यक्रमासाठी योगदान दिले. गावातील 84सदस्य उपस्थित होते 10महिला 74पुरुष उपस्थित होते तर अकाउंट ओपन 3. PMSBY 18 , PMJJBY 06. तर आभा कार्ड 02 काढण्यात आले.
Social Plugin