राजूर/ पत्रकार प्रकाश परते
अकोले तालुकास्तरीय पावसाळी कुस्ती क्रीडा स्पर्धा शुक्रवार दि.२९ ऑगस्ट २०२५ रोजी अँड. एम. एन. देशमुख महाविद्यालय राजूर ता. अकोले येथे पार पडल्या. या कुस्ती स्पर्धेत, जय भवानीमाता विद्यालय केळुंगण च्या दोन खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली.
१७ वर्ष वयोगटातील, ५१ किलो वजनी गटात सुकटे साहिल सक्रू -प्रथम क्रमांक व मुलींमध्ये ४१किलो वजनगटातकु. विशाखा विलास देशमुख- द्वितीय क्रमांक, या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. लांडगे पी.वाय., संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच संस्थापक/रजिस्टार आदरणीय राघू दादा जाधव= सर तसेच केळुंगण गावाचे सरपंच, उपसरपंच क्रीडाप्रेमी ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांनी विजेत्या खेळाडूंचे विशेष अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.विद्यालयाचे क्रीडामार्गदर्शक श्री. जाधव एन. एल., श्री बोंबले आर.एन व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.





Social Plugin