निळकंठ वसू, आलेवाडी
आलेवाडी (प्रतिनिधी) – आलेवाडी ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी एस. एम. बदूकले मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली आणि उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
ग्रामपंचायत सरपंच श्री. रामभाऊ वानखडे यांच्या हस्तेआणि नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य श्री. सचिन भाऊ वानखडे (संचालक, गोपाळकृष्ण ऍग्रो अँड फॅब्रिकेशन, अकोट), सदस्य सौ. रुपालीताई निलेश वानखडे, श्री. दिलीप भाऊ इंगोले, तसेच रोजगार सेवक श्री. अनिल भाऊ भोंगळ, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. ग. श्री. वानखडे, अंगणवाडी सेविका सौ. गोकुळा मॅडम, मदतनीस सौ. वानखडे ताई, आशा वर्कर सौ. राधाताई विनोद पाटेकर आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त गावात देशभक्तीपर गीते, वक्तृत्व, व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून दिली व नवीन पिढीला राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा देणारे विचार मांडले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडले. शेवटी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी एकत्र येऊन चहा व अल्पोपहाराचा आस्वाद घेत देशभक्तीचा उत्सव साजरा केला.
Social Plugin