Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद आदर्श शाळा मोळ येथील नवीन इमारत बांधकामाचे आमदार महेश दादा शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला .



बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

 मोळ गावामध्ये नव्याने होत असलेली आरसीसी आदर्श बांधकामाची इमारतीचे भूमिपूजन आमदार महेश  शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री योगेश कदम ,गटशिक्षणाधिकारी सौ.सोनाली  विभूते , बुध बिटचे  विस्तार अधिकारी शिवाजी कदम , केंद्र प्रमुख संजयजी दिडके , बांधकाम विभागाचे श्री.शाम मोरे ,प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन  श्री नवनाथ जाधव, गुरुवर्य गणपतराव काळंगे हायस्कूल मोळचे मुख्याध्यापक श्री. संजय गोडसे , श्री. दिलीप साबळे ,भाजपा तालुका अध्यक्ष श्री शिवाजी शेडगे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य श्री अभयसिंह राजेघाटगे  ,मोळ गावचे सरपंच श्री वैभव आवळे, उपसरपंच अमोल चिनके माजी उपसरपंच अरुण वाघ, महेंद्र नांगरे, ग्रामपंचायत सदस्या वनिता मोरे, सविता घाटगे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिजीत घाटगे ,उपाध्यक्षा सौ. रूपाली भंडलकर,  सदस्य ,  सोसायटीचे चेअरमन विलास घाटगे, व्हाईस चेअरमन व सर्व सदस्य विविध मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य शिवविवेक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रोशन घाटगे, मोळ गावच्या पोलिस पाटील सौ. पूजा पवार ,बी.एन.वाय. कंपनीचे श्री. अभिजीत ढवळे व ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी गावातील विविध कामाचे भूमिपूजन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .

कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मोटे मॅडम यांनी केले .इमारतीबरोबर शाळेत भौतिक सुविधा मिळाव्यात शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी आम्ही कटिबद्ध राहू असे सांगितले .  विद्यार्थ्यांच्या  गुणवत्तेबरोबर विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण  विकास साधन्याकडे शाळांनी लक्ष द्यावे असे तालुक्याचे नवीन गटविकास अधिकारी श्री योगेश कदम  यांनी सांगितले शाळेचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही वैयक्तिक लक्ष देऊन काम पूर्ण करून घेऊ असेही त्यांनी सांगितले

आमदार शिंदे यांनी  विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबर विद्यार्थी सुसंस्कृत व्हावेत याकडे  पालक, शिक्षक यांनी  लक्ष द्यावे. नजीकच्या काळात मतदार संघातील सर्व शाळांसाठी आदर्श इमारत  देणार असल्याचे सांगितले. भौतिक सुविधांसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नसल्याचे  सांगितले .गुणवत्ते बरोबर संस्कार यावर भर देण्याचे आमदार यांनी  यावेळी बोलताना स्पष्ट केले.यावेळी बहुसंख्य  ग्रामस्थ उपस्थित होते

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   गणपत बनसोडे यांनी केले प्रदीप भोसले यांनी आभार मानले .