Ticker

6/recent/ticker-posts

अण्णाभाऊ साठे: श्रमिकांच्या वेदनांना शब्द रूप देणारे साहित्यक....... प्रा.डॉ.हनुमंत निमसे



बुध  दि . [ प्रकाश राजेघाटगे ]

अण्णाभाऊ साठे यांनी कामगार, भटक्या विमुक्त व बहुजन समाजाच्या दुःखद जीवनाचे वास्तव चित्रण साहित्यामधून प्रभावीपणे मांडले. त्यांनी आपल्या लेखनामधून सामाजिक परिवर्तनाबरोबरच श्रमिकांच्या वेदनांना शब्दरूप दिले असे प्रतिपादन प्रा.डॉ.हनुमंत निमसे यांनी केले. अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त  पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील  मराठी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी‌.भोसले, प्रा.डॉ.संजय  क्षीरसागर आजीव सभासद, रयत शिक्षण संस्था, सातारा. उपप्राचार्य.डॉ.अनिल जगताप  प्रा.एम.एन.आवळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढे आपल्या भाषणात डॉ.निमसे म्हणाले,'अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते तर समाज परिवर्तनाचे सशक्त माध्यम होते. त्यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर  दलित, वंचित आणि कष्टकरी वर्गाच्या व्यथा लोकापर्यंत पोहोचविल्या त्यांचे साहित्य म्हणजे समाजाला जागविणारी मशाल आहे. 

त्यांनी साहित्याच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा संदेश दिला. शोषितांचे वास्तव जीवन, कामगार, भटक्या विमुक्त समाजाच्या दुःखद जीवनाचे चित्रण प्रभावीपणे मांडले. त्यांच्या लेखनातून सामाजिक अन्याया विरुद्ध लढा, स्वाभिमान, परिवर्तनाचा संदेश दिला. पोवाडा, लावणी, भारुड यासारख्या लोककलेच्या माध्यमातून सबंध साहित्य निर्मिती केली. अण्णाभाऊंचे साहित्य हे सामान्य माणसाला समजणारे आहे .त्याचबरोबर क्रांतिकारी भूमिका त्यांच्या 'फकीरा'  कादंबरी मध्ये दिसून येते.  कारण मार्क्सवादी विचार  आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रभावामुळे  सामाजिक समता, श्रमिकांचे चित्रण येते. गावकुसाबाहेरील जीवनाचे वास्तव 'माझी मैना गावावर राहिली" या कथेत शहरात नोकरीसाठी गेलेल्या युवकांच्या नजरेतून गावातील पत्नी (मैना )आणि तिच्या प्रीतीच्या ओढीचे भावनिक वर्णन आहे. मुख्य पात्र शहरात उपासमारीचा सामना करत असताना आपल्या मनाच्या आठवणीमध्ये हरवलेले आहे. हा विरह सामाजिक वास्तवाशी  जोडलेलाआहे. ही प्रेम कथा नसून तिच्या मागे एक व्यापक सामाजिक वास्तव दडलेले आहे. विरह, गरिबी, संघर्षातून माणूस आपल्या माणसाच्या आठवणीवर जगतो.

 ही कथा शोषितांची वेदना आणि त्यांच्या आयुष्याचे वास्तव मांडणारी आहे.म्हणूनच मराठी साहित्या विश्वामध्ये अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीर म्हणून ओळखले जाऊ लागले.एकंदरीत त्यांच्या साहित्यातून क्रांतिकारी भूमिका, सामाजिक समता, श्रमिकांचे स्थान अधोरेखित केलेले दिसून येते .याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. अध्यक्षीय मनोगतामधून प्र.प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले म्हणाले,'अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून समाजाच्या तळागाळातील आवाज उमटतो. त्यांनी अन्याय विरुद्ध लढा दिला. आजच्या पिढीने अण्णाभाऊंचा आदर्श समोर ठेवून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे कारण सामाजिक बांधिलकी जपणारा विद्यार्थी हाच खरा सुशिक्षित असतो असे सांगितले. कार्यक्रम प्रसंगी  प्रोफेसर डॉ.एस.आर.शिंदे प्रा.डॉ.एन.डी. लोखंडे, प्राध्यापक एल. के .पवार प्रा.श्रीमती एम.बी सोनार, प्रा.उज्वला मदने,प्रा.एल.के.पवार प्राध्यापिका मुल्ला, प्रा.डॉ.के.जी कुंभार, प्रा.पी.व्ही.गायकवाड प्राध्यापिका कांबळे मॅडम,प्रा. एस.आर.  धोंगडे,प्रा.एम.एस. वाघ. प्रा.एस. एस.कोकरे इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख उपप्राचार्य प्रा.डॉअनिल जगताप यांनी केली.सूत्रसंचालन प्रा.एम.एन.आवळे यांनी केले. तर आभार प्रा.एस.डी.वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.