पारंपरिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत
बुध दि [प्रकाश राजे घाटगे ]
गणेश मंडळांनी सामाजिक भान ठेवत अनेक मंडळांनी डॉल्बी स्पीकरऐवजी पारंपरिक वाद्य, भजन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची निवड करावी. शालेय विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता वाढीच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करावे. वाढत्या ध्वनीप्रदूषणाच्या समस्येला उत्तर देत, यंदाचा गणेशोत्सव सर्व मंडळांनी डॉल्बीमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी
अजित टिके यांनी केले.
पुसेगाव पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या सर्व मंडळांनी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सपोनि संदिप पोमण, पं.स.विस्तार अधिकारी बोईनवाड, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव बाळासाहेब जाधव, बुधचे उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , संदीप जाधव, मार्केट कमेटी संचालक गणेश जाधव, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद, पोलीस पाटील, यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित टिके म्हणाले,
गणेश उत्सवाचे महत्त्व हे गणपतीचा जन्मदिवस साजरा करणे, तसेच घरात सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित करणे आहे. हा उत्सव बुद्धी, यश आणि अडथळे दूर करणाऱ्या गणपतीच्या भक्तीसाठी केला जातो. महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी १८९३ साली गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले, ज्यामुळे हा उत्सव सामाजिक ऐक्याचे प्रतीक बनला आणि स्वातंत्र्य चळवळीचे साधन म्हणूनही वापरला गेला. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून यंदाचा गणेशोत्सव सर्व मंडळांनी साजरा करावा.
सपोनि संदिप पोमण म्हणाले, पुसेगाव पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या सर्व गावांमध्ये सामाजिक परंपरा चांगली आहे. पुसेगाव परिसरातील
सर्व मंडळांनी शांतता राखत, संस्कृती जपत
शंख, ताशा-धोल, आणि लहान आवाजात वाजवले जाणारे पारंपरिक वाद्य यांचा वापर करत उत्सवात भक्तिभाव निर्माण करावा. शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरणसंवर्धन आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात लघुनाटिका तयार कराव्यात. डॉल्बी स्पीकर्सच्या गोंगाटामुळे होणाऱ्या त्रासाला प्रतिबंध घालण्याचा आणि एक सुसंस्कृत गणेशोत्सव साजरा करून सातारा जिल्ह्याचा राज्यात आदर्श निर्माण करूयात.
भक्ती, संस्कृती प्रबोधनाचा संगम असावा : संदिप पोमण
जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्या संकल्पनेतून डॉल्बीमुक्त सातारा जिल्हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार सर्व गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव हा एक सामाजिक जबाबदारी आहे. हा उत्सव केवळ गोंगाट नव्हे तर भक्तिभाव, संस्कृती आणि समाजप्रबोधन यांचा संगम असावा, अशी भावना संदिप पोमण यांनी व्यक्त केली.





Social Plugin