विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण.
तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड):- गेवराई तालुक्यातील गढी येथील माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते डाॅ. चंद्रशेखर गवळी यांनी सरपंच पदाच्या कार्यकाळात व आरोग्य सेवेच्या माध्यमातून कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांना घरपोहोच आरोग्य सेवा देत अनेकांचा जीव वाचविल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन बी एस एफ बहुद्देशीय संस्था, उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या वतीने त्यांना अमरावतीमध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैशाली सोनवणे तर प्रमुख उपस्थिती म्हणून दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख, निर्माता नंदकिशोर धकिटे, दिग्दर्शक प्यारेलाला शर्मा, निर्माता नानासाहेब बच्छाव, आरती बारवसे अभिनेता योगेश पवार, सावी वासनिक समाजसेवक निळकंठ सरदार, नितीन डांगळे, रूपचंद फुलझेले, किरण पिंजवानी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थींना समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन अश्विनी सांगळे यांनी केले. सोहळ्याचे मुख्य आयोजक भूषण सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.





Social Plugin