Ticker

6/recent/ticker-posts

सावळी रस्त्याच्या पुला संदर्भात पालकमंत्र्यांना निवेदन शाळेतील विद्यार्थ्यांना साधले संवाद



 अतिवृष्टीच्या नुकसानी संदर्भात नांदेड जिल्हाचे पालक मंत्री अतुल सावे यांचा बिलोली दौरा होता त्या दौऱ्यात विविध मागणीचे निवेदन देण्यात आले .

 बिलोली शहरालगत व शाळेजवळच नाला असून त्या नाल्यावर मुसळधार पाऊस आले की रस्ता पुर्ण बंद होत आहे ये जा करण्यासाठी वाहतूक व शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होत आहे तसेच सावळी, डौर ,आरळी गुजरी ,कौठा ,रावधानोरा या गावांना हा रस्ता जोडला गेलेला आहे नाल्याला पाणीपुर आले की रस्ता हा बंदच होत आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याच नाल्याच्या शेजारी इंग्रजी शाळा तेथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तरी त्या मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण व फुलाचे काम करणे आवश्यक आहे. जुलै 2023 मध्ये जवळपास 450 विद्यार्थी व गावकऱ्यांना रेस्कु करुन इंद्रजित तुडमे व सय्यद रियाज व इतर सहकारी यांच्या सहकार्याने बचाव कार्य करुन नाल्यातुन बाहेर काढले होते. त्या वेळी तत्कालीन जिल्हाधिकारी विपीन ईटनकर त्या ठिकाणाची पाहणी देखील केली होती सदरील पुलाचे परपोज संबंधित सामाजिक बांधकाम विभागाच्या वतीने पाठवण्यात आले आहे. पालकमंत्री यांच्याकडे त्वरित पुल मंजूर करून देण्यात यावे अशी मागणी केली. मागणीचे निवेदन भाजपा मंडळाध्यक्ष इंद्रजीत, डॉ अंकुशर,शाळेचे सुब्बाराव रेड्डी, चंद्रशेखर पाटील, सय्यद रियाज,,शांतेश्वर पाटील,आबाराव संगणोर, गंगाधर सुरकुटलावार, प्रकाश मकुरवाड, मुकिंदर कूडके शंकर जेठे ,सिद्दोदन जाधव , अर्शद देशाई , एकनाथ पांचाळ, विरभद्र तळणीकर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत या दोर्‍यात आमदार जितेश आंतापुरकर,जिल्हाधिकारी राहुल करर्डीकर, संतुकराव हंबर्डे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे , तहसीलदार गजानन शिंदे, लक्ष्मण ठक्करवाड, बालाजी बच्चेवार,श्रावण पाटील भिलवंडे, उमाकांत गोपछडे,गणेश पाटील शिंपाळकर, श्रुती तुडमे , , उपविभागीय पोलिस अधिकारी शाम पांगरगावकर, अभियंता चितळकर यांच्यासह अनेक जन उपस्थित