Ticker

6/recent/ticker-posts

तान्हापोळा निमित्त खाऊसाठी जमविलेले ११,७३० रु एक उब जाणिवेचे, या संस्थेला दान



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

कारंजा तान्हा घरोघरी पोळ्यानिमित्त फिरून त्याने खाऊसाठी तब्बल ११,७३० रुपये जमवले आणि मनात कुठलीही लालसा न बाळगता जमवलेली ही रक्कम त्याने थेट गोरगरीब व गरजूंच्या पोटाची भूक भागवणाऱ्या 'एक उब जाणिवेची' या संस्थेला दाण करत समाजापुढे नवा आदर्श उभा केला आहे.

अजिंक्य रवींद्र गाडगे असे या संवेदनशील शाळकरी मुलाचे नाव असून, तो स्थानिक जे. सी. हायस्कूलचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील रवींद्र गाडगे हे माजी सैनिक असून, त्यांची एक उब जाणिवेची' या संस्थेशी वीण जुळलेली आहे. त्यामुळे गोरगरिब आणि गरजू लोकांच्या वेदना कशा असतात? याची त्याला

जाणीव आहे. या सामाजिक जाणिवेतून त्याने स्वतःच्या खाऊसाठी जमविलेले पैसे दान करून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. दरम्यान, तान्हा पोळ्याच्या दिवशी लहान मुले मातीचे बैलघेऊन आपल्या घर परिसरातील घरोघरी जातात आणि या माध्यमातून ते खाऊसाठी पैसे गोळा जे. सी. हायस्कूलच्या विद्यार्थ्याने जोपासली सामाजिक बांधिलकी करतात. यावेळी अजिंक्यने खाऊसाठी गोळा झालेले पैसे गोरगरीब, असहाय्य वृद्धांसाठी काम करणाऱ्या 'एक उब जाणिवेची संस्थेला दान करण्याच्या निर्धार केला. ही बाब त्याने घरचे तथा इतरांसमोर बोलून दाखवली. एवढ्या कमी वयात त्याने बाळगलेला सामाजिक उद्देश पाहून त्याला घरोघरी खाऊसाठी पैसे मिळाले. बघता बघता ११,७३० रुपये गोळा झाले. त्यानंतर त्याने ही रक्कम 'एक उब जाणीवेची संस्थेचे मोहित गावंडे यांच्याकडे सुपूर्द केली. वृद्ध आणि गरजू लोकांना ही मदत मिळावी हा उदात्त हेतू समोर ठेवून त्याने ही मदत देऊ केली आहे.

तान्हा पोळा हे केवळनिमित्त असून सामाजिक जाणीवेचा हा खारीचा वाटा आहे असे मत अजिंक्यने व्यक्त केले. त्याच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल कारंजा एज्युकेशन सोसायटीचे सचिव अमोल भाऊ चवरे, प्राचार्य भारत हरसुले, पर्यवेक्षक प्रशांत गंधक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अजिंक्यचे कौतुक केले आहे.