प्रतिनिधी :-सागर इंगोले
झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन या गावातील प्राचीन काळातील राजराजेश्वर शिव मंदिर हॆ पुरातन मंदिर आहे. येथे दररोज शेकडो च्या संखेने भाविक दर्शनाला येतात.मागील वर्षी परम पूज्य ह. भ. पं. श्री पंडित प्रदीप मिश्रा याची वणी शहरामध्ये सात दिवसाची शिवमहापुराण कथा स्व, राजेशजी जायस्वाल व त्यांच्या पत्नी श्रद्धा जायस्वाल यांनी त्या शिवमहापुराण कथेचे आयोजन केलेले होते. शिवमहापुराण कथेला परिसरातील लाखोंच्या संखेने विविध भागातून कथा ऐकण्याकरिता संपूर्ण भागातून भाविक या शिवमहापुराण कथेमुळे संपूर्ण परिसर शिवमय झालेला होता. त्या कथेमुळे परिसरातील लाखो भाविक शिव भक्तीमार्गाला परिवर्तीत झाले असून मुकुटबन येथील राजराजेश्वर मंदिर येथे त्या कथेमुळे मोठ्या सखेने शिवभक्तांमध्ये वाढ होतांना दिसत आहे.
यामुळे येथील शिव भक्तांनी श्रावण सोमवार व श्रावण मसाच्या निमित्याने निमित्त्याने येथील शिवभक्तांनी कावड यात्रेचे आयोजन करून पिंप्रड येथील पैंगणगा नदीवरून कावड भरून पैनगंगा नदीवरून ते मुकुटबन च्या भोवतील संपूर्ण रस्त्यांनी कावड यात्रा काढण्यात आली मुकुटबन परिसरातील खेड्यापाड्यातील भाविक भक्त या कावड यात्रेमध्ये शामिल झाले व मुकुटबन परिसरामध्ये या कावड यात्रेमुळे संपूर्ण परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले.
Social Plugin