शिरुर ग्रामीण प्रतिनीधी - ( शैलेश जाधव)
रक्षाबंधनाच्या दिवशी 'विशेष' बहिणींसोबतचा भावबंध – सुशांत कुटे यांची सामाजिक संवेदनशीलता!शहरातील युवकांसाठी प्रेरणास्थान ठरणारे भुमिपुञ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे गेल्या १५ वर्षांपासून एक आगळावेगळा उपक्रम सातत्याने राबवत आहेत – रक्षाबंधनाचा पवित्र सण, शहरातील विशेष मुलींसोबत साजरा करण्याचा!
शिरुर शहरातील निवासी मतिमंद मुलींच्या वसतिगृहात दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी सुशांत कुटे स्वतः जातात, त्या निरागस मुलींना राखी बांधून खऱ्या अर्थाने सामाजिक बंधाची अनुभूती देतात. या दिवशी त्या मुलींच्या चेहऱ्यावर उमटणारा हास्यरस आणि आत्मियता, हीच त्यांच्या कार्याची खरी पोचपावती ठरते.सामाजिक कार्य हे एकदिवसीय नव्हे, तर सततचा प्रवास असतो, हे सुशांत कुटे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत प्रेम, आपुलकी आणि सन्मान पोहचवण्याचा त्यांचा हा उपक्रम रक्षाबंधनासारख्या सणाला खऱ्या अर्थाने समाजप्रेमाचं रूप देतो.या वर्षी देखील, शुक्रवार दिनांक ०८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, हा स्नेहसंवादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शिरुर शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सुशांत कुटे यांनी नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहून विशेष मुलींसोबतचा हा आनंद साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
*🌟 "सण साजरे करायला हरकत नाही... पण ते जर एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य फुलवू शकतील, तर त्याला खरी सामाजिक समज म्हणता येईल!" – सुशांत कुटे*
Social Plugin