Ticker

6/recent/ticker-posts

रक्तदान शिबिराला भाविकांचा प्रतिसाद मिळाला



प्रतिनिधी.विठ्ठल कदम 

शिवपुरी (ता. हदगाव) येथील श्रीक्षेत्र कोंडलिंगेश्वर मंदिरात श्रावणमासानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला भाविकांचा प्रतिसाद मिळाला. महंत विरागीदास महाराज यांचा पुढाकाराने व नांदेड येथील गुरू गोविंदसिंगजी ब्लड सेंटरच्या सहकार्यातून झालेल्या शिबिरात ४२ भाविकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप झाले. श्रावणानिमित्त भक्तीला राष्ट्रीय कर्तव्य व सामाजिक जाणिवेची जोड देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजी लांडगे यांनी दिली. यावेळी ब्लड सेंटरचे व्यवस्थापक दिलीप सोनटक्के, कंजाराचे सरपंच प्रदीप तवर, शरद दुगाळे, विकास कोंडामंगल आदी उपस्थित होते.