Ticker

6/recent/ticker-posts

फ्रेंडशिप डे निमित्ताने नूतन वसाहत,अंबड येथे बालमित्रांची उत्साही मैत्री पर्वणी*



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

  आज जागतिक फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने अंबड शहरातील नूतन वसाहतात राहणाऱ्या लहानग्यांनी आपल्या बालसुलभ शैलीत अत्यंत उत्साहात, प्रेमळ वातावरणात आणि रंगतदार पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा केला.सकाळपासूनच परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले होते. विविध रंगीबेरंगी कपड्यांत सजलेले बालमित्र एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधत आपुलकीची नाळ घट्ट करत होते."तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस", "आपण कायम मित्र राहूया" अशा गोड गप्पांनी परिसर गूंजत होता.बालकांनी स्वतःहून केलेली फुलांची सजावट,हाताने बनवलेले ग्रीटिंग कार्ड्स, आणि विविध हस्तकला वस्तूंनी कार्यक्रमाला एक वेगळाच आनंद दिला.काही बालकांनी मैत्रीवर आधारित कविता व गाणी सादर केली. पालकांनीही त्यांच्या या उपक्रमाला भरभरून पाठिंबा दिला.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे "मैत्री म्हणजे काय?" या विषयावर लहानग्यांनी व्यक्त केलेल्या भावनांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.कोणीतरी म्हणालं-"मैत्री म्हणजे भांडण करून लगेच पुन्हा बोलणं!"–या निरागस उत्तराने सर्वांनाच हसू आणि आनंद दिला.

शेवटी सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक फोटो काढत हा सुंदर दिवस आठवणीत साठवून ठेवला.यावेळी दिव्यम सपकाळ,रौनक राऊत,सुशांत कंटुले, स्वरीत काळे,रियांश सपकाळ,रुद्र तौर,राजवीर शेळके,श्लोक देशमुख,शिवराज शिंदे,सानवी शिंदे यानी हा लहानसा कार्यक्रम छोट्या स्तरावर जरी झाला असला,तरी बालकांच्या निरागसतेने आणि प्रेमळ मैत्रीने त्याला खूपच मोठा अर्थ प्राप्त झाला.