Ticker

6/recent/ticker-posts

गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वी गजबजली अंतुर्लीची बाजारपेठ



किरण पाटील ग्रामीण प्रतिनिधी 

गणपती बाप्पांचे आगमन तीन चार दिवसात होणार आहे विघ्नहर्ता म्हटले जाणारे दैवत गणरायाचे आगमन 27 ऑगस्ट रोजी सर्वत्र धूमधडाक्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात गणरायांच्या मूर्तीची दुकाने थाटली आहेत. सजावट करण्यासाठी फुल-माळांची दुकाने लागली आहे .

तसेच विद्युत रोषणाई करण्यासाठी इलेक्ट्रीकल वस्तुचे दुकाने थाटली आहेत.गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारे वस्तु जसे हार,पताके ,मखर,रंगीत कागद यासारख्या अनेक वस्तुचे दुकाने लागली आहे तसेच लाईटींग ,लाईट या इलेक्ट्रोनिक वस्तुचे दुकाने सुद्धा लागली आहे. अंतुर्ली येथे गणपती बाप्पांच्या मूर्तीचे चार पाच दुकाने लागले आहे. 100रुपये,150 रुपयापासून ते 4000 हजार रुपयापर्यंत मुर्तीच्या किंमती आहे असे दुकानादाराकडून सांगण्यात आले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पांच्या मूर्ती बाजारात दाखल झालेल्या आहे.