Ticker

6/recent/ticker-posts

येवतीचा सीआयएसएफ अझहर कासार ची एएसआय पदी नियुक्ती



देगलूर प्रतिनिधी -जावेद अहेमद 


नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील ग्राम येवती येथील रहिवासी व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(सीआयएसएफ)पोलीस शिपाई अझहर युनूस कासार येवतीकर यांची विभागातंर्गत परीक्षेतून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय)म्हणून यापूर्वीच निवड झाली होती.तद्नंतर राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा अकादमी,हकीमपेट,हैद्राबाद येथून रीतसर प्रशिक्षण पूर्ण करून सध्या मंगलोर,कर्नाटक आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियुक्ती झाल्याची आनंदवार्ता रविवार दि.२४ ऑगस्ट रोजी येवती परिसरात पसरली!

अझहर चे वडील गाव परिसरात शेती आणि परंपरागत बांगड्यांचा व्यवसाय करतात.अतिशय जिद्दीने औद्योगिक सुरक्षा दलात भर्ती होऊन तो कैक दिवस पोलीस शिपाई म्हणून सन २०१४ पासून सेवारत होता.गतकाळी विभागातंर्गत परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्याला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी सन २०२५ मध्ये नियुक्ती मिळाली आहे.त्याच्या उत्तुंग यशाने सबंध मुखेड परिसरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.संबंधित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल हे भारत सरकारच्या गृहमंत्रालयातंर्गत कार्यरत असलेले एक केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे.जे विविध सरकारी व खाजगी संस्थांना सुरक्षा सेवा प्रदान करते.

या दलाचा उद्देश मोठी औद्योगिक प्रतिष्ठाने,विमानतळ,मेट्रो रेल्वे,संसद भवन आणि इतर देशातील अतिसंवेदनशील ठिकाण महत्वाच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करणे आहे.त्याच्या उत्तुंग यशाबद्दल गावातील प्रतिष्ठित नागरिक,पञकार,कर्मचारी,

आप्तस्वकीय मिञ परिवारांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.