Ticker

6/recent/ticker-posts

जालना शहरात पुन्हा बस सेवा सुरू करण्याची मागणी



 अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

जालना अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका उपायुक्त नंदा गायकवाड यांना शहरातून बस सेवा सुरू करण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे,जालना शहरात २०२३ पूर्वी रेल्वे स्टेशन ते स्त्री रुग्णालय गांधी चमन या मार्गावर बस सेवा सुरू होती.रस्त्यावरील अडचणींचे कारण देत ही सेवा बंद करण्यात आली.त्यामुळे अंबड ते मुख्य बस स्थानक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व पेशंटला खाजगी वाहनधारकांकडून जादा भाडे आकारले जात असून सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.

तसेच,रेल्वे स्टेशनलगत असलेले एस.टी.बस स्थानक बंद असून तेथे अतिक्रमण झाले आहे. यामुळे बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सुभाष चौक (मुथा बिल्डिंग) परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढून त्या ठिकाणी फेरीवाल्यांना प्रतिबंधक क्षेत्र घोषित करावे व पूर्वीप्रमाणे थांबे निर्माण करावेत,अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

या वेळी विधी सल्लागार एडवोकेट.एम.जी. सोनुने,प्रांत सदस्य एडवोकेट.डी.पी.पाटील जिल्हा अध्यक्ष डॉ रमेश तारगे आदी उपस्थित होते..