Ticker

6/recent/ticker-posts

वसू कुटुंबीयांनी गणेश स्थापना परंपरा राखली, महिलांकडून भजन जागरण



आलेवाडी, ता. 29 ऑगस्ट (प्रतिनिधी):

आलेवाडी येथे गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेल्या गणेश स्थापना परंपरेचा 31वा वर्ष साजरा करण्यात आला. ही परंपरा निळकंठ वसू पाटील यांनी सुरू केली होती. यावर्षी त्यांचे चिरंजीव विवेक वसू पाटील व आशुतोष वसू पाटील यांनी ती परंपरा कायम ठेवत श्रद्धेने व भक्तीभावाने गणेशाची स्थापना केली.

ऋषी पंचमीच्या दिवशी महिलांनी भजन जागरणाचे आयोजन केले. महिला भजन मंडळाच्या सादरीकरणाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले. या भजन जागरणाच्या अध्यक्षस्थानी कुसुमबाई शंकरराव भांडे होत्या. यासोबतच ज्ञानदेवी पंजाबराव वानखडे, सौ. सविता भास्करराव वानखडे, रुख्मिणीबाई सासणकर यांनीही भजनात सहभाग घेतला.

संगीताची साथ श्री. हरिश्चंद्र वानखडे यांनी दिली. त्यांच्या सुस्वर गायनाने वादनात चैतन्य आणले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. रेखा निळकंठ वसू यांनी सर्व मंडळींचे व उपस्थित ग्रामस्थांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी व्यक्त केले की, “ही धार्मिक परंपरा पुढेही आमच्या घराण्याच्या माध्यमातून अखंड चालू राहील.”या सोहळ्यामुळे आलेवाडी गावात भक्तीमय आणि सुसंस्कृत वातावरण पाहायला मिळाले