देगलूर (प्रतिनिधी) जावेद अहेमद:
महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा या संस्थेच्या कार्याध्यक्षपदी रामदास पाटील सुमठानकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे २८ जुलै रोजी पत्र प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा या संस्थेच्या प्रदेश कार्यकारीणीची २७ जुलै रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या बैठकीत सुमठानकरांच्या नियुक्ती प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सुमठानकरांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून जंगी स्वागत करण्यात आले आहे.यानिमित्त आज ३१ जुलै रोजी मोंढा येथील सचिन पाटील कारेगावकर यांच्या कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात समाजबांधव व मित्र मंडळीकडून रामदास पाटील सुमठानकर यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी सचिन पाटील यांचाही वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.
मुळात लिंगायत समाजाची महाराष्ट्र राज्यातील शीर्ष संस्था, जिची स्थापना प्रसिद्ध उद्योजक बाबाशेठ कल्याणी यांचे वडील स्व. निळकंठसेठ कल्याणी, नामदेवसेठ रुकारी अशा अनेक महात्म्यनी समाजाच्या उत्कर्षासाठी एकत्र येऊन सन १९७८ मध्ये गुढी पाडव्याला स्थापन झालेल्या या महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा, पुणे ही संस्था स्थापन झाली. त्या संस्थेवर प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्त केल्याने सुमठानकरांनी श्रेष्ठींचे आभार मानले. ग्रामपातळीवर शाखा स्थापन करून समाज संघटित करणे, समाज महामंडळ, स्मारक, जिल्हास्तरीय वसतिगृह, रुद्र भूमी मुक्ती मोहीम, स्पर्धा परीक्षा केंद्र अशा समाजहितावह कार्याला अग्रगण्यस्थान देऊन समाजोन्नतीसाठी कटीबद्ध असल्याची भावना रामदास पाटील सुमठानकरांनी व्यक्त केली.
यावेळी रामदास पाटील यांचा देगलूर च्या वीरशैव लिंगायत बांधवांच्या उपस्थिती मध्ये सन्मान करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील खानापूरकर,सचिन पाटील कारेगावकर,अरुण पाटील रामपूरकर, डॉ.सुनील बालुरकर, डॉ.रवींद्र भालके, डॉ. राहुल भालके,भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा आदर्श सरपंच संतोष पाटील,श्रीकांत मेडीवार, शंतनु महाराज देगलूरकर,राधेशाम जालनेकर,ऍड.रवींद्र पाटील,प्रशांत पाटील आचेगावकर,शेतकरी नेता कैलास येसगे,लक्ष्मण मुंगडे , बसवंतराव गोपछडे, अशोक जुबरे,गजानन विद्रावार, सूरेश पाटील,विठ्ठल पोलावार,संतोष कौरवार,दिनेश तोष्णीवाल, श्याम पाटील, राजू बच्चेवार,विजय आमटे,वैजनाथ मिसे ,बालाजी चरकुलवार,रामचंद्र कडलवार,मोहन आपसलवार इत्यादी नागरिक उपस्थित होते.
• Scanned by Gmail





Social Plugin