Ticker

6/recent/ticker-posts

नदीला खूप मोठा पूर शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली


सुधाकर नाईक (ग्रामीण प्रतिनिधी) 

हदगाव तालुक्यातील तरोडा शिवारातील लाखाडी नदीला पूर आल्यामुळे अनेकांच्या शेतामध्ये पाणी शिरले यामध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे यामध्ये कापूस. तुर.सोयाबीन.उडीद.मूग आणि इतर पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे शेतकरी राजाने खूप मोठ्या कष्टाने शेती फुलवली होती पण निसर्गाची देणगी म्हणून हेच नुकसान आमच्या पदरात पडलेल आहे सर्व नुकसानग्रस्त शेतकरी आणि गावातील ग्रामस्थ यांचे असे म्हणणे आहे की लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना तात्काळ मदतिची आवश्यकता आहे जर लवकरात लवकर पंचनामे करून मदत नाही मिळाल्यास तीव्र असे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सर्व गावातील ग्रामस्थांनी दिला आहे