●ग्रामीण प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर
बिलोली तालुक्यातील ग्राम थडीसावळी येथील साई कोचिंग क्लासेस मध्ये लोकशाहीर साहित्यसम्राट डाॅ.अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती रविवार दि.३ ऑगस्ट रोजी ठीक दुपारी १२ वाजता साजरी करण्यात आली.कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांवर चिमुकल्यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करून मंचावर आणण्यात आले. तद्नंतर प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे यथोचित पूजन केल्यानंतर, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदमपूर नगरीचे युवा सुपूत्र सीआरपीएफ जवान श्रीराम धोंडीबा चिगळे,तमलूर नगरीचे सुपूत्र सीआरपीएफ जवान शेख रियाज रज्जाकसाब आणि खतगांव गावची कन्या नुकतीच विद्युत सहायक म्हणून निवड झालेली कु.शिवानी गंगाधरराव वाघमारे या सर्व पाहुण्यांचा शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर बाल वक्त्यांची अनुक्रमे समयोचित भाषणे झाली.
यावेळी थडीसावळी ग्रामचे सामाजिक तथा विचारवंत कार्यकर्ते जयरामजी भंडारे यांनी अण्णाभाऊ साठे व भारतीय लष्कर संदर्भात बहुमोल असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक युवराजसिंह चौहान,रवींद्रसिंह चौव्हाण,पोलीस पाटील मष्णेश्वर बोगुलवार, रुद्रयआप्पा मठपती, शिवदानसिंह ठाकूर, संतोषसिंह ठाकूर,माधवसिंह ठाकूर, माधवसिंह मोहनसिंह ठाकूर, कोंडीबा सानेबोईनवाड, कोंडीबा भंडारे, पोचिरामजी भंडारे,गणपत भंडारे,मारोती येडलेवार, साहेबराव येडलेवार,देविदास भंडारे,अशोक येडलेवार, शिवाजी येडलेवार,बाबू भंडारे,संदीप देवराव भंडारे,मोहन कांबळे,धुरपतबाई दत्तू कांबळे,हणमंत डूबुकवाड,दत्ता बोगुलवार, इस्माईल शेख, खतगावचे गंगाधर वाघमारे आदि थडीसावळी, आदमपूर,खतगांव परिसरातील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष कु.मयुरी बंडू नरवाडे हिच्या अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.सूञसंचालन साई कोचिंग क्लासेसचे संचालक चंद्रकांत येडलेवार यांनी केले.
Social Plugin