Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शाळा तरोडा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा



सुधाकर नाईक (ग्रामीण प्रतिनिधी)

तरोडा येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मा. सुधाकर नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले देशभक्तीपर गीता वर आधारित समूहगीत तसेच देशभक्तीपर भाषण सादर केले सर्व गावकऱ्यांनी आणि सर्व पालकांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे खूप काही कौतुक केले