Ticker

6/recent/ticker-posts

हिप्पारगा थडी ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.



 सरपंच इनामदार रबर यांच्याकडून विद्यार्थ्यांना बॅग वाटप तर उपसरपंचाकडून वही व पेन 


मारोती एडकेवार प्रतिनिधी/ हिप्पारगा थडी


हिप्पारगा थडी: भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त हिप्पारगा थडी येथे, ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेत,स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात,सरपंच इनामदार रहेबर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक भूमया मुत्यापोड सर, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हिप्पारगा थडी, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्येपैकी 50% विद्यार्थी स्वातंत्र्यदिनानिमित्त महामानवाविषयी, मनोगत व्यक्त केले. शिक्षक पर्यावरण प्रेमी शिक्षक श्री गेंदेवाड सर, यांनी सूत्रसंचालन केले. व सरपंच इनामदार रहेबर यांनी विद्यार्थ्यांना, स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय पुस्तके ठेवण्यासाठी, बॅग वाटप करण्यात आले. व नवनिर्वाचित उपसरपंच यांनी, वही व पेन वाटप करून स्वातंत्र्य दिन हे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी अनेक,विविध उपक्रम करून दाखवले.हिप्परगा थडी ग्रामपंचायत कार्यालय,व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त उपस्थित गावचे पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षातील विविध संघटनेचे कार्यकर्ते, व पत्रकार बांधव,व शिक्षणप्रेमी व पालक,व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्य दिन हा मोठ्या उत्साहात हिप्परगा थडी येथे   साजरा करण्यात आला.