हिप्परगा थडी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा थडी येथे शालेय विद्यार्थ्यांना आज रोजी मारोती एडकेवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले महापुरुषांच्या विचारांच्या प्रेरणेतुन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरू मानणारे आणि त्यांच्या विचारांच्या चळवळीतील कार्यकर्ते तसेच अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि स्पष्ट उच्चारातुन अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे,खणकर नेतृत्व तसेच कुठलाही स्टेज असो सुसंस्कृत अशा वाणीतुन आपले मनोगत मांडत पुर्ण स्टेज हालवणारे एक सच्चा कार्यकर्ता, समाजसेवक, हसतमुख चेहरा, वेळोवेळी गावातील लहान लेकरांना अभ्यासाचे महत्त्व पटवून सांगणारा , समाजातील सुखादुखात सहभागी होऊन सहकार्य करणारा तसेच वंचित बहुजन आघाडी चे तालुका कार्यकारिणीत सदस्य म्हणून ओळखले जाणारे आणि दैनिक अधिकारनामा चे पत्रकार मारोती एडकेवार यांचा वाढदिवस अनावश्यक खर्च टाळुन तसेच मित्रांमध्ये पार्टी करून वायफळ पैशाची उधळण करण्यापेक्षा हा अतिशय सुंदर असा निर्णय घेऊन त्यांनी हा उपक्रम राबविला , प्रथम सर्व विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक श्री मुत्येफोड सर, शिक्षणप्रेमी शिक्षक गेंदेवाड सर केंद्रप्रमुख नाईक सर ,गायकवाड केसराळीकर सर, संगेवार सर, कुंडलवाडे सर, गायकवाड सर तसेच गावातील उपस्थित सामाजिक कार्यकर्ते एडकेवार गंगाधर, पत्रकार बंधु आमेटवार राजेश,एडकेवार साहेबराव, एडकेवार दिपक, आबाभोई, शिवाजी एडकेवार, मुजाईद, भिमराव, व सर्व विद्यार्थ्यां उपस्थित होते.शेवटी गेंदेवाड सरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मारोती यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या शालेय भेटवस्तू बद्दल सर्व शिक्षक टिमकडुन त्यांचे आभार मानले व पुढे त्यांची अशीच प्रगती वाढत जावो अशी सदिच्छा दिले.





Social Plugin