प्रतिनिधी - निळकंठ वसू, तालुका
अकोट तालुक्यातील आलेवाडी येथील हभप श्री. नागोराव श्रीराम वानखडे यांच्या मातोश्री सौ. रुखमाबाई श्रीराम वानखडे (वय ८४) यांचे दिनांक २3 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.सौ. रुखमाबाई वानखडे यांनी संपूर्ण आयुष्य कष्ट, त्याग, निस्वार्थ सेवा आणि अध्यात्मिक कार्यात घालवले. त्या नेहमी शांत स्वभावाच्या, कुणालाही न दुःखविणाऱ्या, आणि कुटुंबातील भक्कम आधार होत्या.त्यांच्या निधनामुळे वानखडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी दिनांक ५ सप्टेंबर रोजी पुष्पांजली मंगल कार्यालय, अकोला रोड, अकोट येथे शुद्धक्रिया कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शोकाकुल –
श्री. श्रीराम पुंडलिक वानखडे,
हभप श्री. नागोराव श्रीराम वानखडे (सदस्य, मध्यस्थी वधुवर परिचय संस्था श्रद्धासागर अकोट),
श्री. विजय श्रीराम वानखडे व वानखडे परिवार.





Social Plugin