जामनेर : वार्ताहर: ईश्वर चौधरी
सुर्यदिप प्रतिष्ठान शेंदूर्णी संचलित, विद्याभारती देवगिरी प्रांत संलग्नित, सरस्वती प्ले स्कूल व विवेकविरा इंग्लिश मिडीयम स्कुल पहुर याशाळेत गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यापैकीच सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम शनिवार दि ३० ऑगस्ट रोजी श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक केंद्र शेंदूर्णीच्या सेवेकरी सौ काबरा काकू व सौ गुरव काकू तसेच स्वामी सेवेकरी श्री संदीप घोंगडे यांच्या उपस्थितीत शाळेत घेण्यात आला. यामध्ये सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती करण्यात आली व भारतमाता, सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी, शिक्षिका व पालकांनी एकत्रित बसून सामूहिकरित्या गणपती अथर्वशीर्ष पठण करून जप व ध्यान केले, लहानग्यांच्या स्वरात गुंजलेल्या अथर्वशीर्ष पठणामुळे परिसरात पवित्र व मंगलमय वातावरण निर्माण झाले.
सुर्यदिप प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदिप गुजर यांनी प्रास्ताविकात सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना लहान वयातच धार्मिक व सांस्कृतिक मूल्यांची शिकवण मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असे सांगितले तसेच शाळेच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी राबविल्या जाणाऱ्या विद्याभारतीच्या विविध उपक्रमांची, कार्यक्रमाची माहिती देऊन विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबतच आपल्या संस्कृतीचे व अध्यात्माचेही संस्कार ही शाळा देते असे प्रतिपादन केले.
त्यानंतर या कार्यक्रमासाठी आलेल्या सौ काबरा काकूंनी सरस्वती प्ले स्कुल शाळा व विद्याभारतीचे कौतुक करीत उपस्थितांना संबोधित करतांना म्हटले की, विद्याभारती चे कार्य खूप छान व येणाऱ्या पिढीला योग्य दिशा देणारे असून विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आपल्या संस्कृतीची माहिती होऊन त्यांचा कौटुंबिक भावना जागृत होऊन आत्मविश्वास, सामूहिक सहभाग आणि सांस्कृतिक जाण वाढीस लागते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूजा बाविस्कर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ महाजन मॅडम यांनी मानले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक झाली तसेच लहान वयातच संस्कारांचे बीजारोपण करण्याचा प्रयत्न शाळेमार्फत करण्यात आला.





Social Plugin