Ticker

6/recent/ticker-posts

स्वप्नात विचार केला असेल की ,आकाशातून आपण जमीन बघू म्हणून ,पण कॅबिनेट ग्रुप शास्त्रीनगर जामनेर ,यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष स्वप्न झाले साकार.


 जामनेर वार्ताहर  ईश्वर चौधरी 

मित्रहो आपण लहान असताना वरतून विमान गेले की मोठा आवाज एकूण घरातून बाहेर येऊन सर्व मित्रांना जमा करून आकाशात दूरवर असणारे विमान बघायचे  ,आणि आनंदाने नाचायचे.पण आज जामनेर मधील कॅबिनेट ग्रुप शास्त्रीनगर यांच्या माध्यमातून वयाच्या पन्नास ते पंचावनच्या जवळपास गेलेले नागरिकांचे स्वप्न पूर्ण झाले. 

जळगांव ते पुणे असा आनंदमय प्रवास कॅबिनेट ग्रुप शास्त्रीनगर यांच्या माध्यमातून करण्यात आला व गणपती दर्शनाच्या  निमित्ताने हे अनुभव फार छान होते.मनाला आनंद आश्रु देऊन गेलेला हा विमान प्रवास होता.ग्रुपचे  सर्व सदस्यांचे आभार व धन्यवाद मानून , प्रवाशांनी शब्दातून बोलून दाखवले . काहीच्या मनातील स्वप्न पूर्ण करणे याला सुद्धा भाग्यवान म्हटले जाते.